घोडगंगा साखर कारखान्याकडून नवे ऊस लागवड धोरण जाहीर : अध्यक्ष ऋषिराज पवार

पुणे : न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने एक जूनपासून नवीन ऊस लागवड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज अशोक पवार यांनी ही माहिती दिली. याविषयीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीची नोंद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेतकी गट कार्यालयात करावी, असे आवाहन अध्यक्ष पवार यांनी केले.

पवार यांनी सांगितले की, कारखान्याने सभासद शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी दि. १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत को ८६०३२ कोएम ०२६५, व्हीएसआय ०८००५, फुले १५०१२, फुले १५००६, एमएस १०००१, व्हीएसआय १८१२१, व्हीएसआय ४३४, कोसी ६७१ या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. कारखाना प्रशासन सर्व अडचणींवर मात करून संचालक मंडळ, सभासद बंधू-भगिनी, शेतकरी यांचे सहकार्याने पुढील हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here