भिमाशंकर कारखान्यात २५ मेपासून ऊस लागवडीचे नवे धोरण लागू : अध्यक्ष बाळासाहेब बेंडे

पुणे : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२४-२५ मधील नव्या ऊस लागवडीची अंमलबजावणी २५ मेपासून करण्यात येणार आहे. २५ मे ते ३१ मार्च या कालावधीत को ८६०३२, व्हीएसआय ८००५, एमएस १०००१, को ९०५७, कोव्हीएसआय १८१२१, पीडीएन १५०१२, कोएम ११०८२ आदी प्रजातांच्या लागवडीला परवानगी देण्यात आली आहे. सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

अध्यक्ष बेंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांना उपलब्धतेनुसार २५ मे पासून या विविध प्रजातींचे बियाणे वाटप केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा व इतर कागदपत्रांची पूर्तता करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनीही कारखाना कार्यालयात येवून ऊस लागवड करावी. कारखान्याच्यावतीने माती परीक्षण, ऊस रोपे, ठिबक सिंचन योजना आदींची मदत केली जाते असे त्यांनी सांगितले. ऊस नोंदणीबाबत हरकत असल्यास दोन महिन्यात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here