मध्यप्रदेशात लवकरच येणार नवी ऊस निती

नरसिंहपूर : मध्य प्रदेश सरकार राज्यातील ऊस शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने एक नवी निती घेवून येणार आहेत,  ज्यामुळे शेतकर्‍यांची देणी देणे सोपे होईल. या नितीबरोबरच राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याचाही प्रयत्न करतील, की ज्यामुळे नवयुवकांचे करीअर बनू शकेल आणि लोकांना रोजगार मिळू शकेल, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले. नरसिंहपूरामध्ये एका रॅलीला संबोधित करताना कमलनाथ बोलत होते.
नरसिंहपूरात मुख्यमंत्री यांनी जवळपास 11 करोड रुपये खर्चून 100 खाटांचे अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्याबरोबरच त्यांनी केरपानी पूल, शॉपिंग कॉम्पलेक्स, हॉकी स्टेडियम मध्ये एस्ट्रोटर्फ आणि रस्ता निर्माणासाठी भूमिपूजन आणि लोकार्पण केले. ते म्हणाले, शेतकर्‍यांचे कर्ज कृषी क्षेत्रासाठी एक आव्हान होते. ते म्हणाले, आंम्ही 21 लाख शेतकर्‍यांची कर्जे माफ केली आहेत. याच्या दुसर्‍या टप्प्यातील काम सुरु झाले आहे. त्यांनी सांगितलेे की, त्यांचे सरकार राज्यातील नीतिगत सतत विकासासाठी तयार आहेत. राज्यातील नागरीकांनी आमच्यावर जो विश्‍वास ठेवला आहे, तो असाच कायम राहील.
कमलनाथ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापति, आरोग्यमंत्री तुलसी सिलावट, सामाजिक न्यायमंत्री लखन घनघोरिया सह पूर्व केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मान्यवर उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here