आता उत्तराखंडमध्येही जाहीर होणार नवा ऊस दर

उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्येही ऊस दरात वाढ करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उत्तराखंडच्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की लवकरच सरकारकडून ऊस दराच्या वाढीबाबत घोषणा होऊ शकते.

Dailypioneer.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले देण्यासह उसाचा नवा दर लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे. हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर क्षेत्रातील कुंजा बहादूरपूर येथे एका कृषी महाविद्यालयाची लवकरच स्थापना केली जाईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. रविवारी शहीद दिनावेळी त्यांनी विजय सिंह आणि सेनापती कल्याण सिंह यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उत्तराखंडच्या आगामी ऊस धोरणाबाबत माहिती दिली.

उत्तराखंडमधील शेतकऱ्यांनीही ऊस दरात वाढीची मागणी सुरू ठेवली आहे. अलीकडेच देशातील काही राज्यांमध्ये ऊस दरात वाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशसह हरियाणा आणि पंजाबचा समावेश आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here