उत्तर प्रदेशमध्ये मान्सूनआधी होणार ऊस पिकाचा नवा सर्व्हे

पिलिभीत : सरकारने वर्ष २०२२-२३ साठी सोमवारी जाहीर केलेल्या ऊस पिक सर्वेक्षण धोरणाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे, अशी माहिती ऊस विकास तथा साखर उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले. यावर्षीचे सर्वेक्षण २० एप्रिल रोजी सुरू होणार आहे आणि हा सर्व्हे २० जून रोजी समाप्त होईल. त्यापूर्वी १ मे ते ३० जून यांदरम्यान सर्व्हे आयोजित केला गेला होता. मान्सूनच्या सुरुवातीच्या आधीच सर्व्हे पूर्ण करण्याचा उद्देश त्यात बदल करण्यामागे आहे.
ग्लोबल पोझिशनींग सिस्टिमच्या माध्यमातून ५०० ते १००० हेक्टरच्या परिघात मंडल विभाग तयार केली जातील. भुसरेड्डी यांनी सांगितले की, जे लोक साखर कारखान्यांना आपला ऊस पाठविण्यासाठी ऊस विकास समित्यांचे नवे सदस्यत्व घेऊ इच्छितात, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी दिला जाणार आहे. पहिल्यांदाच शेतकरी आपल्या लागण केलेल्या क्षेत्रासंबंधीची सर्व माहिती थेट सरकारी वेबसाइटवर अपलोड करतील. यापूर्वी ही प्रक्रिया वैयक्तिक स्तरावर केली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here