कोरोनाचा नवा व्हेरियंट, महाराष्ट्र सरकारकडून निर्बंध जारी, प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती

64

मुंबई : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभर खळबळ उडाली आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून म्हणजेच परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. प्रवाशांनी एकतर कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत अथवा त्यांना ७२ तासांतील आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. हे रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच प्रवाशांना महाराष्ट्रात येण्याची अनुमती देण्यात येईल.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईननुसार जर असा कोणताही व्यक्ती टॅक्सी, खासगी चारचाकी वाहने अथवा बसमध्ये आढळला तर त्याला ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. अशा वाहनाच्या चालक, वाहक, हेल्परलाही ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. बसबाबत परिवहन एजन्सीच्या मालकाला १००० रुपये दंड भरावा लागेल.

दरम्यान, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व लोकांची चाचणी करण्यात येईल अशी घोषणा केली. लोक कोविडच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या व्यक्तिंना क्वारंटाइन करणं येईल. ख्रिसमस जवळ आला आहे. जगभरातील लोक मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. त्यामुळे मुंबई महापालिका खबरदारी घेत विविध उपाययोजना करत आहे असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here