ऊसाच्या नव्या प्रजातींचा शेतकरी आणि कारखान्यांनाही फायदा

सहारनपूर : साखरेचे कोठार मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक उत्पादन आणि जादा गोडवा असलेल्या उसाच्या नव्या प्रजातींमुळे साखर कारखाने शेतकऱ्यांना चांगले पैसे देण्यास तयार झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील साखर कारखान्याचे व्यवस्थापक आणि त्रिवेणी साखर कारखाना ग्रुपच्या देवबंद युनिटचे उपाध्यक्ष दिनानाथ मिश्र यांनी सांगितले की, ऊसाच्या उत्पादन क्षेत्रात नव्या प्रजाती आल्याचा लाभ शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मिळाला आहे. नव्या प्रजातींपासून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते आहे. तर या उसाचा गोडवाही अधिक आहे. त्रिवेणी कारखान्याने गेल्या हंगामात एक कोटी ६० लाख क्विंटल उसाचे गाळप करून १६ लाख ८० हजार ६८ पोती साखर उत्पादन केल्याचे त्यांनी सांगितले. मिश्र म्हणाले, इथेनॉल बनविण्यासाठी वापरला जाणारा रस गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा मिळाला आहे. तो त्रिवेणी ग्रुपच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील इथेनॉल बनविणाऱ्या युनिटला देण्यात आला आहे. देवबंद साखर कारखान्याने पहिल्यांदाच उसाचा १३ टक्के उतारा मिळवला आहे. देवबंद साखर कारखाना उत्तर प्रदेशातील पहिल्या तीन सर्वोत्तम कारखान्यांमध्ये सहभागी आहे. यामध्ये धामपूर आणि बलराम कारखानाही समाविष्ट आहे. देवबंद कारखान्याने गेल्या गळीत हंगामात एक कोटी ६० लाख क्विंटल उसाचे गाळप केले. साखर उतारा साडेबारा टक्क्यांवर राहिला. आणि १८ लाख ३८ हजार ७०० पोती साखर उत्पादन झाले.

दिनानाथ मिश्र २०१३ मध्ये आफ्रिकेतील देश युगांडा शुगर कॉर्पोरेशनचे सीईओ होते. तेथे चांगले हवामान आणि उसाच्या चांगल्या प्रजाती नसतानाही साखर उतारा सात टक्क्यांवरून वाढवून ९ ते १० टक्क्यांपर्यंत आणण्यात यश मिळवले. मिश्र यांनी उत्तर प्रदेशातील अन्य कारखान्यांचे महा व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी सांगितले की, कोईमतूर ऊस संशोशनद संस्था आणि हरियाणातील कर्नालमध्ये जी नवी प्रजाती १५०२३ विकसीत करण्यात आली आहे, त्यापासून ऊस उत्पादन क्षेत्रात क्रांती होईल. या उसापासून साखर उतारा १४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here