उसाच्या नव्या प्रजातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी होतील दूर

रुडकी : शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिक फायदा देण्यासाठी साखर कारखाने नवनव्या प्रजातीचे ऊस बियाणे उपलब्ध करुन देत आहे. आता लिब्बरहेडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सीओके १५०२३ प्रजातीचे ऊस बियाणे दिले आहे. यावेळी जवळपास ६० हेक्टर जमिनीवर या नव्या प्रजातीचे बियाणे लावण्यात आले आहे. लिब्बरहेडी आणि लक्सर साखक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ही लावण करण्यात आली आहे.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हरिद्वार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक गहू, तांदूळ आणि ऊस आहे. शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करण्यासाठी सहकारी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या आणि कारखान्यांच्यावतीने वेळोवेळी नवनव्या प्रजातीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. लिब्बरहेडी कारखान्याने शेतकऱअयांना सीओके १५०२३ प्रजातीचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे. पहिले वर्ष असल्याने काही शेतकऱ्यांनाच हे बियाणे देण्यात आले आहे. जवळपास ६० हेक्टर क्षेत्रात याची लागवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, या प्रजातीच्या उसाचे वजन जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कारखानेही हा ऊस टाळणार नाहीत. सद्यस्थितीत हरिद्वार जिल्ह्यात सीओएस १३२३५ आणि सीओके १४२०१ या प्रजातीच्या उसाला अधिक मागणी आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या नव्या प्रजातीचा पर्याय शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here