खासगी क्षेत्रात सात लाख नोकरभरती

97

नवी दिल्ली : 2020 मध्ये, खाजगी क्षेत्रात अंदाजे सात लाख नवीन भरती आणि पगारामध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

नोकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, 2020 मध्ये जवळपास 7 लाख नवीन रोजगार निर्मितीची आपेक्षा आहे. यात जास्तीत जास्त नोकर्‍या स्टार्टअपमध्ये निर्माण होतील. हे सर्वेक्षण देशातील मोठ्या 42 शहरातील 12 उद्योग क्षेत्रातील 4,278 कंपन्यांचा समावेश आहे.

2020 मध्ये बेंगळूरु, मुंबई, दिल्ली एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद , अहमदाबाद आणि पुणे या शहरात सर्वाधिक नोकरीच्या संधी असतील. या शहरात सुमारे पाच लाख चौदाहजार नउशे नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता आहे. राजेश कुमार म्हणाले, 2020 मध्ये तंत्रज्ञानाची किंवा तांत्रिक कौशल्यांची मागणी इतर कौशल्यांपेक्षा जास्त असेल.

एका सर्वेक्षणानुसार 2019 मध्ये 6.2 लाख नोकर्‍यांच्या तुलनेत सुमारे 9.9 लाख रोजगार निर्माण झाले होते. 2020 साली किरकोळ आणि ई कॉमर्स क्षेत्रात एक लाख 12 हजार रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here