मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे नवे १५,२५२ रुग्ण आढळले आहेत. तर ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गुरुवारी ओम्रीकॉन व्हेरियंटचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत ३,३३४ ओम्रीकॉन रुग्ण आढळले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ७७,६८,८०० कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १,४२,८५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात २,१५६ रुग्ण आढळून आले. मुंबईबाबत सरकारला दिलासा मिळाला आहे. मुंबईत ८३४ नवे रुग्ण आढळले. तर नागपूरमध्ये १४२० रुग्ण आणि पिंपरी चिचंवडमध्ये १०१२ रुग्ण आढळले. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रुग्ण संख्या घटू लागल्याने कोरोनाची तिसरी लाट संपत आल्याचे मानले जात आहे.