नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी (NFCSF) यांच्यामार्फत दिनांक ४ जून ते १२ जून २०२३ या कालावधीसाठी ब्राझील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘साखर आणि जैव इंधन’ याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्याची सुरुवात ४ जून पासून झाली. या दौऱ्यात शिष्टमंडळ साखर आणि जैव उद्योगातील नवनवे तंत्रज्ञान, साखर आणि इथेनॉल उत्पादनातील घडामोडी, त्याचा भारतातील साखर उद्योगासाठी कसा वापर करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर हे शिष्टमंडळ ब्राझीलमधील मोठमोठ्या साखर उद्योगांना भेटी देणार आहे. या दौऱ्यात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, भाजपचे नेते, कोल्हापूरच्या शाहू उद्योग समूहाचे मार्गदर्शक समरजीतसिंहराजे घाटगे यांच्यासह देशातील साखर उद्योग क्षेत्रात काम करणार्या विविध प्रतिनिधींचा समावेश आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi NFCSF चे शिष्टमंडळ ‘साखर आणि जैव इंधन’ विषयाच्या अभ्यासासाठी ब्राझील दौऱ्यावर
Recent Posts
सांगली : ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या एकत्रित परवान्यासाठी आरटीओंना निवेदन
तुंग : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) विभागाकडून फक्त ट्रॅक्टरचा परवाना मिळतो आहे. अन्य राज्यांत ट्रॅक्टर व ट्रॉली असा दोन्हींचा एकत्रित...
कोल्हापूर : राधानगरीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ उभारणार ऊस प्रजनन केंद्र
राधानगरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने आगामी दोन वर्षात राधानगरीत ऊस प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाच्या प्राथमिक टप्प्यातील मंजुरीनंतर याबाबतचा प्रकल्प अहवाल...
पुणे : नीरा-भीमा साखर कारखान्याकडून दिवाळीसाठी १०० रुपयांचा हप्ता, अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांची घोषणा
इंदापूर : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगाम, सन २०२५-२६ साठी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी...
सातारा : कृष्णा कारखान्यातर्फे दिवाळीला १११ रुपयांचे ऊस बिल सभासदांना भेट, अध्यक्ष डॉ. सुरेश...
रेठरे बुद्रुक : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा दर देण्यात कृष्णा सहकारी साखर कारखाना सर्वात पुढे आहे. कारखान्याने पूर्वीच्या संचालक मंडळाची देणी पूर्ण करून...
सांगली : शिंदे साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन, यंदा ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
मिरज : मोहननगर-आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन नुकतेच उत्साहात करण्यात आले. कारखान्याचे ज्येष्ठ सभासद भानुदास कुंडले व सुनीता कुंडले यांच्या हस्ते...
महाराष्ट्र : ऊस तोडणी कामगार महिलांसाठी, मुलांसाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागात ऊस तोडणी कामगार महिला, मुलांच्या विविध योजनांसाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर...
लातूर : मांजरा कारखान्याच्यावतीने ३,१५० पेक्षा जादा दर देण्याची अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची घोषणा
लातूर : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्य सक्षम करण्यासाठी मांजरा परिवार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आगामी काळात होणाऱ्या गळीत हंगामासाठी मांजरा साखर कारखान्याने ९ लाख...