NFCSF चे शिष्टमंडळ ‘साखर आणि जैव इंधन’ विषयाच्या अभ्यासासाठी ब्राझील दौऱ्यावर

नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी (NFCSF) यांच्यामार्फत दिनांक ४ जून ते १२ जून २०२३ या कालावधीसाठी ब्राझील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘साखर आणि जैव इंधन’ याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्याची सुरुवात ४ जून पासून झाली. या दौऱ्यात शिष्टमंडळ साखर आणि जैव उद्योगातील नवनवे तंत्रज्ञान, साखर आणि इथेनॉल उत्पादनातील घडामोडी, त्याचा भारतातील साखर उद्योगासाठी कसा वापर करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर हे शिष्टमंडळ ब्राझीलमधील मोठमोठ्या साखर उद्योगांना भेटी देणार आहे. या दौऱ्यात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, भाजपचे नेते, कोल्हापूरच्या शाहू उद्योग समूहाचे मार्गदर्शक समरजीतसिंहराजे घाटगे यांच्यासह देशातील साखर उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या विविध प्रतिनिधींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here