नायजेरिया: डांगोटे शुगर कडून सवानाह साखर कारखान्याचे अधिग्रहण

अबुजा: उत्पादन क्षमता आणि आपल्या बाजारामध्ये भागीदारी वाढवण्यासाठी डांगोट शुगर रिफाइनरी (डीएसआर) च्या शेअरधारकांनी सवानाह शुगर कंपनी लिमिटेड च्या औपचारिक अधिग्रहणाला मंजूरी दिली आहे. डीएसआर च्या शेअरधारकांनी आपल्या सर्वसाधारण बैठक़ी दरम्यान दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या बाजूने मत दिले. डीएसआर कंपनीचे चेअरमन अल्हाजी अलिको डांगोटे म्हणाले, डीएसआर आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सवानाह शुगरचे अधिग्रहण केले.

डांगोटे यांच्या नुसार, सवानाह शुगरजवळ 32,000 हेक्टर जमीन ऊसाच्या शेतीसाठी उपलब्ध आहे. तसेच प्रतिवर्ष 50,000 टन साखरेचीक्रशिंग क्षमता आहे. आणि विलिनीकरणानंतर एसएससीएल च्या जमीनीला वाढवण्यासाठी पुढे गुंतवणूक केली जाईल. डांगोटे म्हणाले, डीएसआर बोर्डाने विलिनीकरणानंतर सांगितले की, कंपनी, कर्मचारी आणि इतर भागधारकांसाठी लाभदायक होईल. कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितले की, सर्व संबंधित वनियामक अधिकार्यांद्वारा आवश्यक अनुमोदन देण्यात आले आहे आणि विलिनीकरणामुळे साखर क्षेत्रीय परिदृश्यात सकारात्मक बदल येईल कारण, सरकारची निती कंपनीकडून चांगल्या पद्धतीने लागू केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here