नायजेरिया: डांगोट शुगर रिफायनरी करणार ७०० मिलियन डॉलरची गुंतवणूक

अबुजा : नायजेरियाला साखर उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकारच्या बॅकवर्ड इंटिग्रेशन पॉलिसीला पाठबळ देऊन ७०० मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती डांगोट शुगर रिफायनरी पीएलसीच्या प्रशासनाने दिली.

डांगोट शुगर्सचे महा व्यवस्थापक जॉन बेवरली म्हणाले, कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रति दिन १२ हजार टन उसाचे गाळप करू शकतो. याशिवाय, ९० मेगावॅट विजेचे उत्पादनही केले जाईल. ऊसाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी परिसरात सुमारे ५०० किलोमीटरचे रस्ते बनविण्यात येणार आहेत.

डांगोट इंडस्ट्रिज लिमिटेडने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नसरवा असेंम्ब्लीच्या सदस्यांनी दौरा केल्यानंतर आढावा घेऊन याची घोषणा केली. डांगोट शुगरच्या प्रशासनाने संसद सदस्यांना आश्वासन दिले की, बीआयपीअंतर्गत नसरवा आणि अदमवामध्ये साखर उत्पादन प्रकल्प पूर्ण करून देशात दरवर्षी आयात केल्या जाणाऱ्या साखरेच्या निम्म्या परदेशी चलनाची बचत केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here