नायजेरियाचे साखर, इथेनॉल उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न

218

अबुजा : रस्ता, पाणी आणि चांगल्या मनुष्यबळासारख्या चांगल्या पायाभूत सुविधांनी साखर आणि इथेनॉल उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्याची गरज आहे असे प्रतिपादन नायजेरीयाच्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सीलचे कार्यकारी सचिव जे. एच. अदेदेजी यांनी केले. नायजेरीयाची कृषी क्षमता पाहिली तर देशांतर्गत मागणी पुर्ण करून साखर आयात करण्याची गरज भासणार नाही असे अदेदेजी यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी सचिव अदेदेजी यांनी उद्योजकांच्या प्रतिनिधींच्या सभेत समितीच्या सदस्यांच्या वतीने बोलताना सांगितले की, मनुष्यबळ आणि नैसर्गिक संसाधने या दोन्ही बाबी नायजेरियामध्ये भरपूर आहेत. नायजेरीयात साखर आणि त्याच्या उप पदार्थांचा निर्यातदार बनण्याची क्षमता आहे. ते म्हणाले, नायजेरिया शुगर मास्टर प्लॅननुसार (एनएसएमपी) साखर क्षेत्रातील सर्व धोरणांचे, नियमांचे पालन केले जाते. मात्र, पूर, परदेशी चलनाची कमतरता, सांप्रदायिक शत्रुत्व अशी काही आव्हाने आपल्यासमोर आहेत.

अदेदेजी म्हणाले, सध्याच्या काळात प्रशासनाचे कार्यक्रम आणि आर्थिक वैविध्याची धोरणे साखर क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. हे एक असे क्षेत्र आहे की जे नायजेरीया आणि नायजेरीयाच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरीच्या शोधात रस्त्यावर फिरणारी आपल्या युवा पिढीच्या भविष्यासाठी, हे क्षेत्र विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here