साखर उत्पादन वाढविण्यावर नायजेरियाचा जोर

271

अबुजा : जर देशाच्या साखर उद्योगातील बॅकवर्ड इंटिग्रेशन योजना यशस्वी झाली तर नायजेरिया आफ्रिकेच्या वार्षिक ११ मिलियन मेट्रिक टनाची मागणी सहजपणे पूर्ण करू शकतो असे नॅशनल शुगर डेव्हलपमेंट काऊन्सिलने (एनएसडीसी) म्हटले आहे.

एनएसडीसीचे कार्यकारी सचिव जॅक एडेडीजी यांनी बीआयपीच्या ऑपरेटर्सच्या बैठकीत सांगितले की, नायजेरीयात वार्षिक १.७ मिलियन मेट्रिक टन साखरेचा वापर केला जातो. साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी २५० मेट्रिक हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती केली जाणे गरजेचे आहे. नायजेरीला मुख्य साखर उत्पादक देश बनण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांत ज्या आव्हानांनी या क्षेत्रात देशाला मागे ढकलले आहे, त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न एनएसडीसी करीत आहे. एनएसडीसी कारखाने आणि प्रत्यक्ष ऊस लागवड क्षेत्रातील यंत्रसामुग्री आयात करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत ऑपरेटर्सकडून अडचणी आणि अहवाल मागवित असल्याचे एडेडीजी यांनी सांगितले.

अर्थ मंत्रालयाचे कर धोरण विभागाचे उप संचालक बशीर अब्दुल कादिर यांनी सांगितले की साखर उद्योगात बीआयपीच्या सदस्यांकडून जर ठराविक प्रक्रियेचे पालन केले गेले, तर त्यांना आयात शुल्कापासून सूट, बंदरातील सूट आणि मूल्यवर्धित करापासून लाभ मिळू शकतो. मशिनरीसाठी शून्य साखर आयात शुल्क प्रोत्साहन म्हणजे राष्ट्रीय शुगर मास्टर योजनेचा भाग आहे. मशिन आयात करण्यामध्ये बीआयपीच्या ऑपरेटर्सना येणाऱ्या अडचणींबाबत उद्योग मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. अडचणी सोडविण्यासाठी एनएसडीसीला पाठबळ दिले जाईल असे कादिर यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here