नायजेरीयाचा साखर उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी मास्टर प्लॅन

अबुजा : नायजेरीयाने आपल्या महसूल सुधारणा आणि विविधता आणण्यासाठी तसेच आपल्या उत्पादनांना जागतिक बाजारात निर्यात करण्याच्या अपेक्षेने सुधारणांना गती दिली आहे. २०१५ मध्ये राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी प्रशासन येण्यापूर्वी नायजेरीया खूप मोठ्या प्रमाणात आयातीच्या माध्यमातून आपली साखरेची गरज भागवत होता. नायजेरीया गेल्या अनेक वर्षांपासून साखर आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे.

देशाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, संघीय कार्यकारी परिषद एफईसीने अलिकडेच साप्ताहिक बैठकीनंतर यामध्ये राष्ट्रीय शुगर मास्टर प्लॅनच्या दुसऱ्या टप्प्यात टेक ऑफ साठी तात्काळ स्वीकृती दिली आहे. मास्टर प्लॅनचा पहिला टप्पा २०१२ मध्ये मंजूर करण्यात आला होता. तर हा प्लॅन २०१२ ते २०२२ पर्यंत सुरू राहाणार होता. दहा वर्षाच्या योजनेत देशासाठी परकीय चलन वार्षिक ३५० मिलियन डॉलर बचत करणे आणि साखर उद्योगाच्या मूल्य शृंखलेत १,१०,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी तयारी करण्यात आली आहे.

देशाचे उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक मंत्री Niyi Adebayo यांनी सांगितले की, देश इथेनॉल आयातीवर ६५.८ मिलियन बचत आणि ४०० मेगावॅट विज निर्मिती करण्यासाठी तत्पर आहे. दुसऱ्या टप्प्यात २०२३-२०३३ या पुढील दहा वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये साखर उत्पादनात आत्मनिर्भरता येईल. देशात वार्षिक १६ मिलियन लिटर इथेनॉल आणि १.६ मिलियन टन पशू आहार उत्पादन करण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here