महाराष्ट्र, यूपी, गुजरात आणि हरियाणासह अनेक राज्यांत नाइट कर्फ्यू

53

कोरोनाच्या नव्या ओम्रीकॉन व्हेरियंटचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरियाणासह अनेक राज्यांत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय आणखी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने नाईट कर्फ्यू घोषित केला. सरकारने ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागत समारंभात सहभागी होऊ नये असे आवाहन लोकांना केले आहे. देशात ३५८ ओम्रीकॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र नवे २० रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात आज रात्रीन ९ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. राज्यात ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी असेल. नियमंचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड होईल. तर इतर समारंभांचे आयोजन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. लग्न समारंभांवरही निर्बंध आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २५ डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत हा कर्फ्यू असेल.

गुजरातमध्ये अहमदाबाद,वडोदरा, सुरत, भावनगर, जामनगर, गांधीनगर, जुनागड येथे ११ ते सकाळी ५ या वेळेत कर्फ्यू आहे. येथे १३ रुग्ण आढळले आहेत. एकूण ४३ जण संक्रमित आहेत. हरियाणातही कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत असेल. ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात निर्बंध लागू आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here