शाहजहांपूर : गळीत हंगाम २०२१-२२ च्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सहकारी क्षेत्रातील पुवाया साखर कारखाना आणि बजाज ग्रुपची मकसुदपूर साखर कारखाना ऊस गाळप करून बंद झाला आहे. तर उर्वरीत तीन कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. दालमिया ग्रुपची निगोही येतील साखर कारखाना यावेळी १.३० कोटी क्विंटलहून अधिक ऊस गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तर कारखान्याच्या गेटवर अद्याप ऊस आवक सुरू आहे.
ऊस गाळप २०२०-२१ मध्ये मकसुदपूर साखर कारखान्याने ६६.०१ लाख क्विंट उसाचे गाळप केले होते. मात्र, यंदा या कारखान्याने ५८.२६ लाख टनाचे गाळप करून पाच मार्च रोजी सत्र समाप्ती केली. पुवाया साखर कारखान्याने गेल्या वर्षी २६.२९ लाख क्विटंल उसाचे गाळप केले. मात्र, यंदा तांत्रिक बिघाडामुळे आणि ऊस आवक घटल्याने कारखान्याने २५.३५ लाख क्विंटल ऊस गाळप करून दोन एप्रिल रोजी हंगाम समाप्ती केली. बिर्ला ग्रुपच्या अवध शुगर वर्क्सने (रोजा साखर कारखाना) गेल्यावर्षी ७२.९२ लाख क्विंटल ऊस गाळप केला होता. यावर्षी कारखान्याने ६६.१९ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. कारखान्याला आणखी काही दिवस ऊस मिळेल. निगोही साखर कारखान्याने गेल्या वर्षी १२९.९२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. यावर्षी आतापर्यंत १२९.७२ लाख क्विंटल उसाचे गाळप करून २९.१४ लाख क्विटंल साखर उत्पादन केले आगे. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशिराम भार्गव यांनी सांगितले की या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणखी दहा लाख क्विंटल ऊस आहे. त्याचे गाळप करुनच कारखाना बंद होईल.