नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ

90

पंजाब नॅशनल बँकेत कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला कर्जबुडवा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून आता 19 सप्टेंबपर्यंत त्याला तुरुंगात रहावं लागणार. नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे. ही वाढ करुन ब्रिटनच्या कोर्टाने नीरव मोदीला पुन्हा एक धक्का दिला आहे. यापूर्वी जुलैमध्ये ब्रिटनच्या कोर्टाने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या 13,500 करोड रुपयाच्या घोटाळाप्रकरणी नीरव मोदीला दि. 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. शिवाय त्याला जामीनही नामंजूर केंला होता.

जुलैमध्ये ज्यावेळी हिरा व्यापारी नीरव मोदी प्रकरणी सुनावणी करताना वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने दि. 22 ऑगस्ट च्या पुढील सुनावणीपर्यंत नीरव मोदीला आपल्या ताब्यात ठेवावे असे आदेश मेट्रोपॉलिटन पोलिसांना दिले होते. त्या न्यायालयीन कोठडीचा अवधी 28 दिवसांनी वाढवला आहे. आता नीरव मोदीला दि. 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात रहावे लागणार.

नीरव मोदीला दि. 19 मार्चमध्ये अटक केली होती. तेव्हापासून तो वैंडसवर्थ तुरुंगात आहे. नीरव मोदीला व्हिडिओ लिंकद्वारे कोर्टात सादर करुन, त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी केली. जामीन मिळवण्यासाठी नीरव मोदीचे प्रयत्न सुरु आहेत, पण त्याची जामीन याचिका चार वेळा फेटाळण्यात आली होती. त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा हाती लागणार नाही, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. मागच्या वेळची सुनावणी देखील व्हिडिओ लिंकद्वारेच झाली होती.

पंजाब नॅशनल बँकेचा आरोप आहे की, नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोकसी यांनी काही बँक कर्मचार्‍यांच्या सहकार्याने 13,500 करोड रुपयांचा घोटाळा केला आहे. यानंतरच दोघांचा तपास ईडी आणि सीबीआय द्वारा सुरु आहे. ईडी ने चोकसी विरुद्ध मुंबईमध्ये धन शोधन निवारण अधिनियम अंतर्गत कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. नीरव मोदी आणि मेहुक चोकसी दोघांनीही 2018 मध्ये भारत सोडला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here