ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळवण्यासाठी दिला नितीन गडकरी नी हा सल्ला 

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

जादा नफा मिळवण्यासाठी पीक पद्धत बदला, असा सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऊस  शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच उसापासून इथेनॉल तयार करण्यावर जास्त भर दिला पाहिजे, असे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे.

गडकरी यांच्या हस्ते पानीपत-खातीमा या ५ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन झाले. तसेच नमामी गंगे प्रकल्पाच्या २३२ कोटी रुपयांच्या कामाची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली.

यावेळी गडकरी म्हणाले, ‘जगभरातच साखरेचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही. म्हणूनच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे आता उसातून पैसे मिळणे कठीण झाले आहे.’ नागरिकांनी देशांच्या उन्नतीसाठी जातीयवादाला मूठमाती दिली पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here