फ्लेक्सी फ्लूएल वाहने एक वर्षात रस्त्यावर आणण्यावर नितीन गडकरींचा जोर

158

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय वाहन बाजारात एका वर्षात फ्लेक्सी फ्युएल वाहने (एफएफव्ही) रस्त्यावर आणण्यावर जोर दिला. गडकरी यांनी वाहन निर्मिती कंपन्यांना सर्व व्हेरियंट आणि सेगमेंटमधील वाहनांमधये किमान सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याचे आवाहन केले.

मंत्री गडकरी यांनी ट्विट केले आहे की, आज नवी दिल्लीत सियामच्या (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) सीईओंच्या प्रतिनिधींशी भेट झाली. भारतात १०० टक्के इथेनॉल आणि गॅसोलीनवर धावू शकतील अशी सक्षम फ्लेक्स फ्युएल वाहने एक वर्षात रस्त्यावर उतरू शकतील यावर जोर देण्यात आला.

ते म्हणाले, की प्रवाशांच्या हितासाठी मी सर्व वाहन निर्मात्यांना सर्व वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंत्री गडकरी यांची सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या सीईओंच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.. यामध्ये व्यावसायिक आणि दुचाकी वाहन निर्मात्यांचाही समावेश होता. भारत सरकारने इथेनॉलवर आधारित फ्लेक्स फ्युएल इंजिनला अनुमती देण्याची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती. केंद्रीय रस्ते परिवाहन आणि राज्यमार्ग मंत्री गडकरी यांनी एका कार्यक्रमात याबाबत सांगितले होते. गडकरी यांनी जीवाश्म इंधनाच्या जागी इथेनॉल उत्पादन कृषी उत्पादनातून केले जाईल. पुढील तीन महिन्यांत ही योजना लागू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here