पाटणा : राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतीपासून मोहभंग होत आहे. त्यामुळे ऊस शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता शेतकऱ्यांना भातासोबत ऊस शेतीलाही अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. भात शेतीच्या माध्यमातून शेतकरी ऊस शेतीकडे वळू शकतील असे प्रयत्न आहेत. ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढावे यासाठी नियोजन केले आहेत. ऊस उद्योग विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी याचा विस्तृत प्लॅन केला आहे. या अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर भाताचे बियाणे दिले जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांना दहा हजार रोपांसाठी १५ हजार रुपयांच्या अनुदानावर देण्याची तयारी केली आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले की, उसाचे उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांच्या समृद्धीसोबत रोजगार निर्मितीही होईल. यातून कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होणार आहे. सध्या कारखान्यांना पुरेसा ऊस मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कारखाने तीन महिनेही चालत नसल्याचे दिसते. यासाठी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी २२ हजार हेक्टरमधील शेतकऱ्यांना ऊस शेतीवर अनुदान दिले जात आहे. उसाचा दरही वाढवला आहे. शेतकऱ्यांना बहुपर्यायी शेतीसाठी प्रयत्न केले जातात. गेल्या वेळी पाच रुपये आणि आता २५ रुपये देण्यात आले आहे. बिहारने कमी कालावधीत साडेचार लाख कॅन इथेनॉल विक्री केली आहे. ऊस पिक पुराच्या विळख्यात सापडू नये याची काळजी आहे.