व्याज दरात बदल नाही: आरबीआय गव्हर्नर

50

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण आढावा जाहीर केला आहे. आढावा बैठकीनंतर यावेळी व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे त्यांनी सांगितले.

गव्हर्नर दास यांनी जाहीर केल्यानुसार रेपो रेट आता ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.२५ टक्के असाच राहील. आरबीआयची पतधोरण आढावा समिती म्हणजे एमपीसीतील बैठकांच्या निर्णयांची घोषणा करताना दास यांनी सांगितले की आर्थिक विकासाच्या शक्यतांमध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत. आणि महागाईचा दर ६ टक्क्यांवर आला आहे. महागाईचा दर ४ टक्क्यांच्या गटात आला आहे. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षात जीडीपीच्या वाढीचा दर १०.५ टक्के राहील असा अंदाज आहे.

गव्हर्नर दास म्हणाले, २०२० या वर्षात आपल्या सामर्थ्याची परीक्षा झाली आहे. आणि आता २०२१ मध्ये नव्या आर्थिक युगाची सुरुवात होत आहे. आता जानेवारी ते मार्च या कालावधीत महागाईचा दर ५.२ टक्क्यांपर्यंत राहील.
वस्तूत‌: रेपो रेट म्हणजे बॅंका बॅकेने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने कर्ज घेतात. बॅंकांच्या या कर्जावर आरबीआयला ज्या दराने व्याज देतात, त्याला रेपो रेट म्हटले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here