रेपो दरात बदल नाही, कर्जाच्या ईएमआय कपातीसाठी करावी लागणार प्रतीक्षा

भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) पतधोरण बैठकीचे निष्कर्ष समोर आले आहेत. आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. रेपो रेट ४ टक्क्यांवरच राहील. त्यामुळे बँकांकडून ईएमआय घटविला जाणार नाही.

रेपो दरात कपात झाल्यास बँकांवर व्याज दर कमी करण्याचा दबाव निर्माण होतो. जर बँकांनी व्याज दर घटवले तर ईएमआयही कमी होतात. आरबीआयने सलग सातव्या बैठकीतही रेपो दर ४ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने २२ मे २०२० रोजी दरात बदल केले होते. त्यावेळी ते निच्चांकी स्तरावर आणले होते.

आरबीआयच्या गव्हर्नरांनी सांगितले की, अर्थव्यवस्था अद्याप कोविड १९च्या संकटातून बाहेर पडलेली नाही. त्यामुळे रेपो दर स्थिर ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जीडीपाचा दर ९.५ टक्के राहील अशी शक्यता आहे. चौथ्या तिाहीत जीडीपाचा दर ६.१ टक्के राहण्याची शक्यता आहे. लसीकरण वाढल्यास आर्थिक व्यवहारही वाढतील. आरबीआयच्या निर्णयाने शेअर बाजारात घसरण दिसून आली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here