संजीवनी कारखाना बंद होणार नाही

पोरवोरिम: धारबरोरा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारची कोणतीही योजना नसल्याचे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच या कारखान्यावर अवलंबून असणार्‍या उस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या सांगण्याचे आदेश कृषी विभागाला देवून या शेतकर्‍यांकडून इतर पिकांची लागवड करुन घेण्याच्या सूचनाही दिल्या.

ते म्हणाले, साखर कारखाना बंद होणार नाही. कारखान्यांची व्यवहार्यता तसेच उसाचे कारखान्यांना होणारे गाळप या गोष्टी समजून घेण्यासाठी अभ्यासाचे आयोजन केले आहे. ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वीच उस उत्पादन केले आहे, त्यांचा उस घेण्यासंदर्भात सावंत यांनी खाजगी साखर कारखान्यांना सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here