साखरेची कमी नाही: फिजी शुगर कॉरपोरेशन

सुवा (फिजी): फिजी शुगर कॉरपोरेशनच्या अंदाजानुसार साखरेचा पुरवठा सामान्य होईल. या पुरवठयाला कायम ठेवण्यासाठी फिजी शुगर कॉरपोरेशन (FSC) चे पॅकिंग प्लांट मध्ये चोवीस तास काम होत आहे.

फिजियन कंपिटीशन एंड कंज्यूमर कमीशन चे सीईओ जोएल अब्राहम म्हणाले की, FSC आणि फिजी पोलीस यांच्या सोबतच्या असेसमेंट आणि चर्चेनंतर ते फिजी च्या नागरीकांना सूचित करणार होते की, FSC जवळ साखर स्टॉक 15,000 टन पेक्षा अधिक आहे आणि त्यांना 2 किलो आणि 4 किलो बॅगमध्ये पॅक केले जात आहे.

अब्राहम म्हणाले, साखर कारखान्यांमध्ये चोवीस तास काम होत आहे. काही ठिकाणी साखरेचा पुरवठा सुरु झाला आहे, उर्वरीत भागातही पुढच्या आठवड्यात पुरवठा सुरु केला जाईल. या दरम्यान, फिजी शुगर कार्पोरेशन ने सांगितले की, फिजीमध्ये यावेळी साखरेची कमी नाही. काही सुपर मार्केट मध्येच साखरेचा स्टॉक नाही.

FSC चे सीईओ ग्राहम क्लार्क म्हणाले, लुटोका मध्ये लॉकडाउन करुनही साखरेची ऑर्डर सामान्य करण्यासाठी पॅकिंग अधिक लोड केले जात आहेत. ते म्हणाले की, आमच्या देशात साखरेची कमी नाही. पण काही दुकानदारांमध्ये भितीचे सावट आहे आणि ते साखर जमा करत आहेत.

ते म्हणाले, देशात साखरेचा पर्याप्त स्टॉक आहे. केवळ काही सुपर मार्केट मध्ये साखर उपलब्ध नसल्याची बातमी आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here