नेदरलँडमध्ये साखरेवर टॅक्स लागू नाही: आरोग्यमंत्री

एम्स्टर्डमण,नेदरलँड : आरोग्य मंत्री पॉल ब्लोकहिस यांनी खासदारांना सांगितले की,नेदरलँड सरकरकडून येणाऱ्या काळामध्ये साखरेवर टॅक्स लागू होणार नाही, कारण याप्रकारच्या उपायांची प्रभावशीलता आतापर्यंत सिद्ध झालेली नाही. पण कोल्ड्रिंक्स मध्ये साखरेचे प्रमाण कमी करण्यावर खाद्य फर्मस बरोबर इतर करार करण्यात आले. जगभरामध्ये, 43 देशांनी साखरेवर टॅक्स लावला आहे, ज्यामध्ये यूरोपीय संघातील 10 देशही सामिल आहेत. नेदरलँड मध्ये साखरेवर टॅक्स लावण्याचा आग्रह करण्यात आला होता.

ब्लोकहिस यांनी खासदारांशी बोलताना सांगितले की, ज्याप्रकारे फ्रान्स, नॉर्वे आणि यूके मध्ये साखरयुक्त पेंयावर टॅक्स लावण्याच्या पद्धतीने तुलनात्मक रुपाने काही सकारात्मक फायदे दिसतात, पण याचे दिर्घकालीन प्रभाव आतापर्यंत सिद्ध होवू शकले नाहीत , कारण टॅक्स काही वेळेपूर्वीच लागू केला आहे. संशोधनाने हे समजले की, तीनही देशांंमध्ये साखरयुक्त पेयाचा वापर कमी झाला आहे, आणि नॉर्वेमध्ये अधिक बाटलीबंद पाणी विकले जात आहे, पण हे स्पष्ट झाले नाही की, हा टॅक्सचाच परिणाम आहे. त्यांनी सांगितले की, केवळ साखरच लठ्ठपणाचे कारण नाही, याशिवाय, आणखीही इतर उपायांना सरकारच्या आरोग्य जीवन शैली कार्यक्रमात सामिल करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here