ऊस तोडणी मजुरांच्या कमीमुळे, शेतकरी अडचणीत

156

मैसूरु(कर्नाटक): मजुरांच्या कमी मुळे कर्नाटकातील ऊस शेतकरी अडचणीत आले आहेत. आणि कित्येक शेतकरी आपले पीक नष्ट करत आहेत. मंड्या जिल्हयाच्या पांडवपुरा तालुक्यामध्ये एका शेतकर्‍याने आपला ऊस नष्ट केला.

चिक्कबदादारहल्ली गावातील सी.बी. चंदन यांनी आपल्या 1 एकर जमीनीवर पिकेलल्या 50 टन ऊसावर ट्रॅक्टर फिरवला. मंड्यामध्ये मैसूर शुगर आणि पांडवपुरा मध्ये पांडवपुरा सहकारी साखर कारखाना बंद होण्यामुळे शेतकर्‍यांचा नाइलाज झाला आहे. मंड्या जिलह्यातील शेतकर्‍यांना आपला ऊस कमीत कमी किमतीत गुर्‍हाळ्यांना विकावा लागतो आहे किंवा खाजगी साखर कारखान्यांना विकावा लागत आहे. चंदन यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून साखर कारखाने बंद आहेत आणि ऊस तोडणीसाठी मजुरांचीही वानवा आहे. येथील ऊस शेतकरी साधारपणे ऊस तोडणीसाठी ठेकेदारांच्या माध्यमातून उत्तर भारतातून श्रमिकांना घेवून येतात.

ऊस उत्पादक संघाचे प्रदेश अध्यक्ष कुरुबुरु शांताकुमार यांनी सांगितले की, ऊस शेतकर्‍यांना आपले पीक नष्ट करण्यापासून वाचवले पाहिजे. कोरोनामुळे खाजगी कारखान्यांनीही आपले कार्य थांबवले आहे. यामुळे उत्तर भारत आणि उत्तर कर्नाटकातील मजुर घरी परत आले आहेत. मैसुरु आणि मंड्या येथील लोक जे दुसर्‍या राज्यात गेले होते, ते आता आपल्या गावी आले आहेत. शेतकरी त्यांच्याकडून ऊसाची तोडणी करुन घेवू शकतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here