“एकरकमी एफआरपी देणे अशक्य “

1038

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य आहे. त्यामुळेच टप्प्या टप्प्याने एफआरपी देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही परिस्थितीतून मार्ग काढत असतानाही आमच्यावर कारवाई होत असेल, तर कारखान्यांचे गाळप बंद करू, असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला आहे.

कारखानदारांच्या या इशाऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला कारखाने चालवणे जमत नसेल तर, आम्ही सक्षम आहोत. आम्हाला चाव्या द्या, असे आव्हान संघटनेने साखर कारखानदारांना दिले आहे. साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करून त्यातून ऊस उत्पादकांचे पैसे द्या, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरआरसीच्या कारवाईस दिरंगाई होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातही गोंधळ घातला.

संघटनेच्या पुण्यातील हल्ला बोल आंदोलनाची दखल घेऊन, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाईसाठी मागणी करण्यासाठी जात असल्याची माहिती साखर कारखानदारांना मिळाली. त्यामुळे त्यांनी संघटनेच्या आधीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह आरआरसीची नोटीस लागू झालेल्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचा समावेश होता.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here