जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन साखर कारखान्यांना नोटीस

बागपत : शेतकऱ्यांची ७२० कोटी रुपयांची ऊस बिले थकीत असल्याबद्दल जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना जिल्हाधिकारी राज कमल यादव यांनी नोटिसा दिल्या आहेत. पैसे लवकर न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मलकपूर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ४६१ कोटी रुपये थकीत आहेत. तर रमाला आणि बागपत सहकारी साखर कारखान्याकडे २५९ कोटी रुपये थकीत आहेत. कोरोनाच्या काळात पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुलांची लग्ने, आजारपण अशा खर्चालाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी मलकपूर, बागपत आणि रमाला या तीन कारखान्यांच्या प्रशासनाला नोटीसा दिल्या आहेत. इतर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनीही बागपतच्या शेतकऱ्यांचे ३१८ कोटी रुपये थकवले आहेत. बागपत येथील तीन आणि इतर जिल्ह्यातील नऊ अशा बारा कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एकूण १०३८ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत ठेवली आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here