उसाचे पैसे वेळेत न देणार्‍या सहा साखर कारखान्यांना नोटीस

बिजनौर(उत्तरप्रदेश) : ऊसाचे पैसे वेळेत न देणार्‍या सहा साखर कारखान्यांना शासनाने पुन्हा नोटीस दिली आहे. या साखर कारखान्यांवर 585 करोड रुपयें बाकी आहेत. या कारखान्यांना लवकरात लवकर थकबाकी भागवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. देणी लवकरात लवकर भागवली गेली नाहीत तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील हे सर्वच साखर कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करत आहेत. पण खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे शेतकर्‍यांना वेळेत दिले जात नाहीत. ऊस खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत पैसे शेतकर्‍यांना देणे असा नियम आहे. पण या नियमाचे पालन केले जात नाही. बिजनौर साखर कारखान्याने तर या हंगामातील ऊस गाळपाचा एक रुपयाही दिलेला नाही. ऊसाची बिले न देणार्‍या सहा साखर कारखान्यांना गेल्या महिन्यातच प्रशासनाने नोटीस दिली होती. पण त्यांच्यात कोणतीही सुधारणा नाही. बिजनौर साखर कारखान्याने गेल्या गाळप हंमागात खरेदी केलेल्या ऊसाचे सर्व पैसे दिले आहेत.

बिजनौर, चांदपुर, बरकातपूर, स्योहारा, बिलाई वं धामपूर साखर कारखाने थकबाकी भागवण्यात पिछाडीवर आहेत. यामध्ये बजाज ग्रुप च्या बिलाई कारखान्याने तथा वेव ग्रुपच्या बिजनौर एवं चांदपुर कारखान्यांची अवस्था वाईट आहे. हे कारखाने शेतकर्‍यांना वेळेत पैसे देवू शकत नाहीत. बिजनौर कारखान्यावर 57 करोड, चांदपुर कारखान्यावर 89.55, बरकातपूर वर 105.57, बिलाई कारखान्यावर 203, स्योहारा वर 80.22 आणि धामपुर वर 50.55 करोड रुपये देय आहेत. हे भागवले नाहीत तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा उस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मते, देणी भागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साखर कारखान्यांना नोटीस देवून 14 दिवसांच्या आत पैसे देण्यास सांगण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here