वैकुंठपूर : भारत साखर कारखाना सिधवालियामध्ये उसाचा गळीत हंगाम २०२२-२३ च्या समाप्तीची पहिली नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटीशीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कारखान्याला शिल्लक असलेला ऊस पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारखान्याला क्षमतेनुसार ऊस पुरवठा सध्या होत नाही. त्यामुळे कारखाना सुरू ठेवल्यास नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे वगळता ऊस आहे, त्यांनी तातडीने पाठवावा असे आवाहन केले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नोटिस पाठवल्यानंतरही जर कारखान्याला ऊस पुरवठा झाला नाही, तर शिल्लक उसाला कारखाना जबाबदार राहणार नाही. ऊस विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. के. सिंह यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी प्रगत वाणाचे बियाणे वापरावे असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.