जीएसटी चुकविणाऱ्या ७५ हजार जणांना नोटीसा

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

माल आणि सेवा कर (जीएसटी) चुकवणारे अधिकारी गुजरात येथे स्कॅनरमध्ये सापडले आहेत. अहवालानुसार, जीएसटी अधिकाऱ्यांनी जवळपास 75 हजार करचुकव्यांना पकडले असून त्यांना कर चुकवल्याबाबत नोटीसाही पाठवण्यात
आल्या आहेत. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, ई वे ब्लिस जनरेट केलेल्या आणि जीएसटीआर 1 भरलेल्या, पण जीएसटीआर 3 बी ची पूर्तता केलेली नाही अशा जवळपास 22 हजार उद्योजकांनाही कर भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत.

15 हजार व्यापाऱ्यांना मिळालेल्या नोटीसांमध्ये कर पत दाव्यांमध्ये विसंगती आढळली आहे. आठ हजार उद्योजकांना सरकारच्या अधिकृत नोटीसीला सामोरे जावे लागत असून त्यांची जीएसटी टॅक्स पेयर अशी नोंदही नाही. 30 हजार ज्यांनी जीएसटी भरलेली नाही त्यांना या नोटीसा म्हणजे एक सणसणीत चपराक आहे. नुकतेच, बोगस चलनद्वारे जीएसटी परतावा मिळवणाऱ्याना 5,106 निर्यातदारांचाही सरकारने पर्दाफाश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here