ऊस बिले न दिल्याबद्दल बिलाई साखर कारखान्याला नोटीस

बिजनौर : गेल्या गळीत हंगामातील सर्व बिले न दिल्याबद्दल ऊस विभागाने बिलाई साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. कारखान्याने चालू हंगामात केलेल्या ऊस गाळपाचे बिलही अदा केलेले नाही. मात्र इतर कारखान्यांकडून ऊस बिले देण्यात येत आहेत. ऊस विभागाने कारखान्याला नोटीस बजावून बिले न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिलाई साखर कारखान्याकडे गेल्या ऊस हंगामातील ८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
ऊस विभागाकडील आकडेवारीनुसार १२ डिसेंबरपर्यंत कारखान्याने चालू हंगामात ३४.३६ लाख क्विंटल ऊसाची खरेदी केली आहे. त्याचे मूल्य ११८ कोटी ५४ लाख रुपये आहे. साखल कारखान्याने या हंगामात अद्याप एकही बिल दिलेले नाही. बिलाई साखर कारखाना वगळता जिल्ह्यातील इतर कारखाने चालू हंगामातील उसाला एफआरपीनुसार दर देत आहेत. जिल्ह्यात ८३.४२ टक्के ऊस बिले देण्यात आल्याचे जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, भाकियू अराजकीयचे युवा प्रदेशाध्यक्ष दिगंबर सिंह चौधरी यांनी सांगितले की, बिलाई साखर कारखान्याद्वारे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घर चालविण्यासह गव्हाची पेरणी, बियाणे खरेदी आदी गोष्टींसाठी अडचण येत आहे. साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगाम आणि आधीची थकीत बिले त्वरित दिली पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here