ऊस बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन कारखान्यांना नोटीस

पिलीभीत : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ४२६ कोटी ३२ लाख ३७ हजार रुपये अडवले आहेत. ऊस बिले मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस खरेदी अधिनियमानुसार ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसात त्याचे पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होत नसल्याने आता बिले देण्यास उशीर केलेल्या तीन साखर कारखान्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत एएलएच कारखाना बिले देण्यात आघाडीवर आहे. कारखान्याकडे फक्त ६७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक उसाचे पैसे बरखेडा येथील बजाज ग्रुपच्या कारखान्याने थकवले आहेत. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे २५९ कोटी २ लाख २६ हजार रुपये अडकले आहेत. जसजशी साखर विक्री होईल, तसे पैसे देऊ असे कारखान्याचे म्हणणे आहे.

याबाबत दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र यांनी सांगितले की कारखाना अशा स्थितीत अधिक साखर विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकतो. बिसलपूर आणि पूरनपूरमध्ये सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडूनही देणी प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तीन कारखान्यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा आणि त्यानंतर तिसरी नोटीस दिली जाईल. जर तिन्ही नोटीसांनंतरही पैसे दिले नाहीत तर रिकव्हरी सर्टिफिकेट जारी करण्यात येणार आहे. ऊस बिल थकीत असल्याने उपचारात अडचणी आल्यासे नवदिया सुंदरपूरचे शेतकरी गुरमित सिंह यांनी सांगितले. तर रमभोजा येथील अतुल कुमार दीक्षित यांनी बरखेडा बजाज हिंदूस्थान कारखान्याने तीन लाख रुपये थकवल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here