आता सहजपणे जाणून घ्या हवामानाचा अंदाज, सरकारने लॉन्च केले ‘मौसम‘ अ‍ॅप

98

नवी दिल्ली: पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी हवामानासंबंधी पूर्वानुमानासाठी सोमवारी एक मोबाइल अ‍ॅप ची सुरुवात केली आहे. याच्या माध्यमातून शहरातील हवामानाचा अंदाज आणि इतर सूचना मिळतील. इंटरनैशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स, भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्थान, पुणे आणि भारत हवामान विज्ञान विभाग यांनी एकत्रितपणे हे अ‍ॅप तयार केले आहे.

यावेळी हर्षवर्धन यांनी सांगितले की, नवी उपकरणे, कंप्यूटर संदर्भात संसाधने आदी बदलण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची गरज आहे. कमीत कमी उपस्थित बजेट च्या दुप्पट गुंतवणुकीची गरज आहे. ‘मौसम‘ अ‍ॅप गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल च्या अ‍ॅप स्टोर वर उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून जवळपास 200 शहरांचे तापमान, दमटपणाचा स्तर, वार्‍याची गती आणि दिशांसह हवामाना संदर्भात इतर माहिती मिळेल. यावर दिवसात आठ वेळा सूचना अपडेट केल्या जातील.

या अ‍ॅपमध्ये देशातील जवळपास 450 शहरांसाठी पुढच्या सात दिवसांचा हवामानाचा अंदाज सांगितला जाईल. गेल्या 24 तासातील माहिती देखील या अ‍ॅपवर सांगितली जाईल. यामध्ये सर्व जिल्ह्यांसाठी रंग आधारित अलर्ट (लाल, पिवळा, नारंगी) सिस्टीम देखील असेल ज्याच्या माध्यमातून प्रतिकूल हवामाना बाबतीत लोकांना सूचना दिली जाईल. हे 800 केंद्र आणि जिल्ह्यांसाठी तीन तीन तासाच्या अवधीमध्ये हवामानाचे पुर्वानुमानही देईल. खराब हवामाना दरम्यान परिसरामध्ये काय काय समस्या निर्माण होवू शकतात, याचेही अनुमान सांगितले जाईल. तसेच, गेल्या 24 तासामध्ये हवामानाची माहितीही अ‍ॅपमध्ये असेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here