आशियातील सर्वात श्रीमंत आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्त असलेले गौतम अदानी एका पाठोपाठ एका सेक्टरमध्ये एन्ट्री करीत आहेत. आपल्या व्यवसायाच्या विस्ताराच्या क्रमात त्यांनी आणखी एक बडी डील केली आहे. ही डील ८३५ कोटी रुपयांची आहे. या अंतर्गत अदानी लॉजिस्टीक आता इनलँड कंटेनर डिपोर (ICD) टम्बचे (Tumb) अधिग्रहण करणार आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडची सब्सिडरी कंपनी अदानी लॉजिस्टिक्सने ही माहिती दिली आहे. कंपनीने ICD Tumb च्या अधिग्रहणासाठी नवकार कॉर्पकडे ८३५ कोटी रुपयांचा करार केला आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, आयसीडी टम्ब ही सर्वात मोठ्या इनलँड कंटेनर डेपोत सहभागी असल्याचे बिझनेस टुडेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आयसीडी धोरणात्मक रुपात हजीरा बंदर आणि न्हावा शेवा बंदरादरम्यान आहे. त्याची क्षमता ०.५ मिलियन अथवा ५ लाख टीईयू आहे. भविष्यातील व्यवसाय क्षमता आणि कार्गोसाठी ही डील मदत करणारी ठरेल. कंपनीने आता टम्ब आयसीडी योजनांना ताकद मिळेल, असे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडचे (APSEZ) सीईओ करण अडानी (Karan Adani) यांनी देशातील ही सर्वात मोठी आयसीडीमध्ये एक टम्ब अधिग्रहणापासून आमच्या योजनांना बळ मिळेल असे सांगितले.