आता १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप युनिट्स हे नव्या भारताचा आधारस्तंभ असल्याचे सांगत दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी विविध क्षेत्रातील स्टार्टअप व्यावसायिकांशी व्हर्च्युअल संवाद साधत सांगितले की, ‘स्टार्टअप ही संस्कृती देशभरात तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जाणार आहे.’

स्टार्टअप्सना सरकारी प्रक्रियेपासून दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या रुपात वाणिज्य, उद्योग मंत्रालय तसेच डीपीआयआयटीकडून १० ते १६ जानेवारी या काळात सेलिब्रेटिंग इनोव्हेशन इको सिस्टीमचे आयोजन केले आहे. त्यामध्ये त्यांनी व्यावसायिकांशी संवाद साधला. २०१३-१४ मध्ये चार हजार पेटंट्सला मंजुरी मिळत होती. आता याची संख्या २८ हजारपेक्षा अधिक झाली आहे. २०१३-१४ मध्ये ७० हजार ट्रेडमार्क नोंदणीकृत झाले होते. आता २०२०-२१ मध्ये अडीच लाखांहून अधिक ट्रेडमार्कची नोंदणी झाली आहे. कॉपीराइट्सची संख्याही चार हजार वरुन १६ हजार झआली आहे. तर देशात सध्या ६०,००० स्टार्टअप्स असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here