आता महिलांनाही मिळणार उस शेतीचे प्रशिक्षण

241

कोल्हापूर: शेती, दुग्ध व्यवसायात महिला अग्रेसर आहेतच. शेताची भांगलणी, खुरपणी यासह इतर छोटी मोठी कामेही महिलांकडून सक्षमपणे होतात. यासाठी पाडळी खुर्द ता. करवीर) मधील 40 शेतकरी महिलांना उस शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण देवून प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्सिस्टट्यूटमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये, साखर उद्योगाची सद्य:परिस्थिती व भविष्यातील वाटचाल काय असणार, ग्रामीण अर्थव्यवस्थेत उस आणि साखर कारखान्यांचे योगदान कसे आहे, भविष्यात त्या उद्योगासमोरील आव्हाने काय असणार आणि त्याकडे कसे पाहिले पाहिजे, कमी क्षेत्रात जादा, निरोगी आणि दर्जेदार उस कसा घ्यावा, यासाठी उसाच्या कोणत्या जातींची लागण करावी, या उस जातीमधील कोणकोणते गुणदोष आहेत याचाही अभ्यास या ठिकाणी होणार आहे.

पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतात काबाडकष्ट करणार्‍या 40 महिला उसाच्या शेतीचे धडे गिरवणार आहेत. ‘आत्मा‘ च्या सहकार्याने व श्री भैरवनाथ कृषी स्वयंसहाय्यता गटाच्या पुढाकाराने या महिला मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये रविवार पासून (दि.9) तीन दिवसांचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक घेतील. यासाठी आत्माच्या अधिकारी कुर्‍हाडे व भैरवनाथ कृषी स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष नारायण जाधव, उपाध्यक्ष आर.के. पाटील व सचिव वसंतराव गायकवाड यांच्यासह गटातील इतर सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.

उस लागवडीच्या आधुनिक पद्धती, आंतरमशागत उसाच्या खोडवा पिकाचे व्यवस्थापन, हेक्टरी 250 टन उस उत्पादनाचे तंत्र, पारंपारिक प्रवाही सिंचन पद्धत व निचरा व्यवस्थापन, ठिबक व तुषार सिंचन पद्धत, उस शेतीसाठी सुधारित औजारे, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरुप जीवाणू खते, त्यांचे महत्व आणि वापर, गांडूळ खत निर्मिती व त्याचा वापर, उस पिकांवरील रोग व त्यांचे नियंत्रण, उसाला उपद्रव देणारी खोड कीड, उसाला उप्रदव देणार्‍या होलोट्रॅकिया हुमणीचे नियंत्रण, लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रण, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उस शेती.

या प्रशिक्षणात गीता पाटील, अरुणा पाटील, सुजाता पाटील, वैशाली सोहनी, सुवर्णा पाटील, लीलावती मोहिते, मेघा पाटील, अक्काताई पाटील, शारदा पाटील, अंजली पाटील, अर्चना पाटील, सज्जाक्का कदम, लक्ष्मी तानुगडे, छाया पाटील, सुवर्णा तानुगडे, वर्षा पाटील, सुनंदा पाटील, सविता पाटील, माधुरी पाटील, ऋचा जाधव, अश्‍विनी कदम, सारिका ढेंगे, रूपाली पाटील, सारिका रा. पाटील, लक्ष्मी बा. पाटील, मंगल तानुगडे, अनिता पोतदार, सुलभा पाटील, सारिका सु. पाटील, रंजना पाटील, संगीता पाटील, वैशाली वि. पाटील, आकाशी पाटील, सरिता पाटील, वैशाली स. पाटील, भारती पाटील, लक्ष्मी हं. पाटील आदी महिलांचा समावेश आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here