आता 100 तासाच्या आत होणार खाण्डसारी परवान्याच्या आवेदनावर काम

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने नव्या खाण्डसारीसाठी परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेला सोपे बनवले आहे. ज्यामुळे उद्योजकांना केवळ 100 तासाच्या आत ऑनलाइन खाण्डसारी परवान्याची अनुमती मिळेल. नव्या प्लांटसच्या स्थापनेसाठी आवेदन ऑनलाइन ही जमा केले जावू शकते. राज्याचे साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांच्या अनुसार, विभागाने आवेदन जमा करण्याच्या 100 तासाच्या आत ऑनलाइन परवाना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, एक सोपी निती आणि संगणकीकृत परवाना प्रणालीच्या सुरुवातीने 131 परवाने जारी केले आहेत. ज्यामुळे 34,550 टीसीडी (प्रति दिन टन क्रश) क्षमता आहे. जी आठ साखर कारखान्याच्या गाळप क्षमते इतकी आहे.

सोप्या प्रणालीमुळे, ग्रामीण भागांमध्ये खाण्डसारी स्थापित केली जात आहेत, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ऊसाचा वापर करण्यामध्ये मदत मिळेल. ऊस आयुक्त म्हणाले की, 131 नव्या परवान्यांपैकी 14 महिला उद्योजकांद्वारा प्राप्त केल्या गेल्या आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here