कोरोना काळात साखर उद्योगातील आव्हानांचा सामना कसा करावा याबाबत 29 एप्रिलला एनएसआय (NSI) तर्फे वेबिनारचे आयोजन

कानपूर : इतर उद्योगांप्रमाणे, देशातील साखर उद्योगावरही कोविड-19 चा परिणाम झाला आहे. देशामध्ये यावर्षी जिथे साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे, तिथेच साखरेचा वापर गेल्या वर्षापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. मिठाई, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्री व इतर पेय पदार्थांचा उपभोग कमी झाल्यामुळे साखरेचा वापर कमी झाला आहे. साखरेचा वापर जागतिक स्तरावर कमी झाल्यामुळे साखरेचे आंतरराष्ट्रीय दर बाजारात कमी झाले आहेत. यामुळे तसेच वाहतुकीच्या समस्येमुळे साखरेच्या निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच साखर कारखान्यांशी संबंधित डिस्टीलरींनी उत्पादित केलेल्या इथेनॉल पासून पेट्रोल मध्ये 10 टक्के मिश्रण केल्यावर ही कच्च्या तेलांच्या किंमती कमी होण्याची तसेच एकूण तेलाचा वापर कमी होण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीचा आणि आव्हानाचा सामना कसा केला जावा आणि कोणत्या विकल्पांवर काम केले जावे, या संदर्भात दिनांक 29 एप्रिल 2020 ला राष्ट्रीय शर्करा संस्थान तर्फे ‘इमपॅक्ट ऑफ कोविड-19 इन इंडियन शुगर इंडस्ट्रि‘ या वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय शर्करा संस्थानचे व्यवस्थापक प्रा. नरेंद्र मोहन, या विषयावर विवेचन करणार आहेत. तसेच देश विदेशातील सहभागी झालेल्यांच्या प्रश्‍नांची उत्तरेही देतील. या वेबिनारसाठी देश विदेशातून 500 पेक्षा अधिक नोंदणी झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here