साखर कारखान्याच्या गाळपात अडथळे, वाहनांच्या रांगा

लखिमपूर खिरी : डीएससीएल अजबापूर साखर कारखान्याच्या टर्बाईनचा ग्रीड सातत्याने फेल होत असल्याने ऊस गाळपात अडथळे येत आहेत. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टर तसेच बैलगाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

अजबापूर शुगर मिलच्या टर्बाईनचा ग्रीड दुपारी एक वाजता अचानक तुटला. त्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येने ऊसाच्या गाळपात अडथळे निर्माण झाले. साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून या कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत या रांगा आहेत.

शेतकऱ्यांना उसाचे वजन करण्यासाठी अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे. या तांत्रिक समस्येची सोडवणूक करण्याचे प्रयत्न कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सुरू आहेत. त्यानंतर उसाचे वजन केले जाईल. सद्यस्थितीत कारखाना प्रशासनाने ऊस उशीरा घेऊन येण्याची सूचना शेतकऱ्यांना मोबाईलवरून दिल्या आहेत. इतर तोडणी पावत्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here