ब्रिटनमध्ये अधिकृतपणे मंदी घोषित

118

कोरोनाचा परिणाम पूर्ण जगावर दिसून येत आहे. याच्या समोर जगातील मोठमोठ्या देशांची आर्थिक स्थिती डगमगत आहे. कोरोनाचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेमद्ये अधिकृतपणे मंदी आली आहे. कोरोनाच्या फैलावाला रोकण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्रिटन ची अर्थव्यवस्था एप्रिल आणि जून दरम्यान विक्रमी 20.4 टक्क्यापर्यंत संपुष्टात आली आहे, जेव्हा कोरोना वायरस लॉकडाउन सर्वात मजबूत होता. हे कोणत्याही प्रमुख अर्थव्यवस्थेकडून रिपोर्ट करण्यात आलेले सर्वात मोठे आकुंचन नोंदवण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये सातत्याने दोन तिमाही दरम्यान नकारात्मक विकास दर असल्याने अर्थव्यवस्था अधिकृतपे मंदीच्या विळख्यात सापडली गेली असल्याचे मानले जाते. ब्रिटन प्रमाणे जगातील अनेक देशामंध्ये अर्थिक स्थिती नाजूक झाली आहे आणि तिथेही मंदी येण्याचे संकेत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here