तेल वितरण कंपन्या स्थापन करणार डझनभर इथेनॉल प्लांट

113

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्या (ओएमसी) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेसनच्यावतीने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत जवळपास १२ इथेनॉल प्लांट सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी सांगितले की, तिन्ही प्रमुख ते कंपन्यांना १००० कोटी लिटरपैकी जवळपास १५० कोटी लिटर प्रती वर्ष इथेनॉल निर्मिती क्षमतेचे प्लांट सुरू करण्यास सांगण्यात आलेले आहे. त्यातून २०२५ पर्यंत उद्दिष्टपूर्तीसाठी मदत मिळणार आहे.

कपूर यांनी सांगितले की, यामध्ये ५००० कोटी रुपयांपासून ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ते म्हणाले, या कंपन्या इतर निर्मात्यांकडून खरेदी केलेल्या इथेनॉलच्या साठवणुकीची सुविधा निर्माण करतील. कारण अंतिम मिश्रण रिफायनर आणि तेल वितरण कंपन्यांकडून केले जाते. भारताने २०२१ या वर्षात आधीच ५ टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले आहे. या वर्षी भारत ८ टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठेल अशी शक्यता आहे.

कपूर यांनी अलीकडेच एका वेबिनारमध्ये सांगितले की, आम्ही गेल्या वर्षी १७३ कोटी लीटरच्या तुलनेत या वर्षी जवळपास ३३०-३४० कोटी लिटर इथेनॉल खरेदी करू अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. हे ई १० उद्दिष्ट असून २०२५ पर्यंत ई २० या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचे टार्गेट आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here