इथेनॉल, बायोगॅससह इतर प्रकल्पांच्या विस्तारासाठी ऑइल इंडिया कर्जाद्वारे ५५० मिलियन डॉलर उभारणार

नवी दिल्ली : ऑइल इंडियाने (Oil India) पेट्रोकेमिकल्स, इथेनॉल, बायोगॅस आणि नूतनीकरणक्षम उर्जा या क्षेत्रात विस्तार आणि वित्तपुरवठा करण्यासाठी बँक ऑफ बडोदा (BoB) मार्फत पाच वर्षांच्या बाह्य व्यावसायिक कर्ज सुविधेचा (external commercial loan facility) लाभ घेत ५५० दशलक्ष डॉलर्स निधी उभारण्याची योजना आखली आहे.

या अंतर्गत पाच वर्षांचे कर्ज सहा महिन्यांच्या बेंचमार्क सुरक्षित ओव्हरनाइट फायनान्सिंग रेटशी (secured overnight financing rate/SOFR) जोडले जाईल. याबाबत ‘इकॉनॉमिक टाईम्स’मधील वृत्तानुसार, या कराराशी संबधित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, कर्जाची किंमत सहा महिन्यांच्या SOFR दरापेक्षा ११० बेस पॉइंट्सवर असेल. दर सहा महिन्यांनी तत्कालीन प्रचलित SOFR दराशी संबंधित एक रीसेट क्लॉज यात असेल. एक आधार अंक म्हणजे ०.०१ टक्के पॉइंट्स असतील. जवळपास सहा महिन्यांचा SOFR सुमारे ५.३९% आहे. या डीलची अंतिम किंमत सुमारे ६.४९ टक्के असण्याची शक्यता आहे. याबाबत आतापर्यंत बँक ऑफ बडोदा आणि ऑइल इंडियाकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here