ओएमसींकडून उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसवर आधारित इथेनॉलचे सुधारित वाटप

नवी दिल्ली : इंधन वितरण कंपन्यांनी (ओएमसी) उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसवर आधारित इथेनॉलचे सूचक सुधारित वाटप जारी केले आहे. याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (डीएफपीडी) १५ डिसेंबर २०२३च्या आदेशानुसार, ओएमसींना उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसवर आधारित इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी प्रत्येक डिस्टिलरीला सुधारित वाटप आणि सुधारित करार करण्यास सांगितले होते. इथेनॉल उत्पादनासाठी मर्यादित १७ लाख टन साखर वळवण्यासाठी हा बदल केला जात आहे.

ओएमसींनी ऑक्टोबर २०२३ मध्ये, इथेनॉल उत्पादन वर्ष २०२३-२४ यासाठी ८२५ कोटी लिटर इथेनॉलसाठी निविदा जारी केली होती. यामध्ये साखर-आधारित फीडस्टॉकमधून २६५ कोटी लिटर, उसाच्या रसावर आधारित इथेनॉलमधून १३५ कोटी लिटर आणि बी-हेवी मोलॅसिसवर आधारीत १३० कोटी लिटरचे वाटप करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आता सुमारे १५७ कोटी लिटरचे पुन्हा वाटप करण्यात येत आहे. यामध्ये उसाच्या रसापासून सुमारे ४२ कोटी लिटर आणि बी हेवी मोलॅसिसपासून ११५ कोटी लिटरचा समावेश आहे. (बीएचएमसाठी सुमारे १० लाख टन आणि एससीजेसाठी सुमारे ७ लाख टन साखर वळवली जाईल).

सुधारित वाटप वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here