ओंकार कारखाना उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणार : चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील

सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्रधान्य दिले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात उपपदार्थ निर्मित प्रकल्प व गाळप क्षमतेत वाढ होणार असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जास्तीत दर देण्याबाबत ओंकार परिवार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले. ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट १ चा चौथा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा चेअरमन बाबूराव बोत्रे – पाटील, रेखाताई बोत्रे- पाटील, चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ व नंदाताई सुळ यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोत्रे-पाटील म्हणाले, कारखान्याला कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना आपण शेतकऱ्यांना वेळेत व समाधानकारक दर दिला आहे. यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला जाईल. कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना दिवाळीसाठी मोफत साखर दिल्याबद्दल सर्वांच्यावतीने रामचंद्र मगर यांनी ओंकार परिवाराचे आभार मानले.

माजी सरपंच भजनदास चोरमले म्हणाले की, ओंकार साखर कारखान्यामुळे चांदापुरी गावाची प्रगती झाली आहे. कारखान्याला गावाचे सहकार्य राहील. संचालक प्रशांत बोत्रे- पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील, जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे, चिफ इंजिनिअर तानाजीराव देवकते, केन मॅनेजर शरद देवकर, चांदापुरी, निमगाव व तरंगफळ, पिलीव, पठाण वस्ती, कुसमोड, झंजेवस्ती येथील शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विष्णू गोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here