सोलापूर :ओंकार साखर कारखान्याने हाती घेतलेले नवीन प्रकल्प, गाळप क्षमतेत वाढ, इथेनॉल, कंपोस्ट खत प्रकल्प यासह या हंगामात पेट्रोल पंप कार्यान्वित होणार आहेत.गाळप क्षमतेत वाढ झाल्याने कारखान्याने १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, अशी माहिती ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील यांनी दिली.ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एकच्या मिल रोलरचे पूजन प्रशांतराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील म्हणाले की, कारखान्यातील अंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत.आता ऊस तोडणीसाठी व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंद कारखान्याकडे देऊन आपला ऊस ओंकारला घालावा.यावेळी चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ, कारखान्याचे जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते, केन मॅनेजर शरद देवकर, डिस्टलरी मॅनेजर पी.डी.पाटील, धन्यकुमार जामदाडे, सुरक्षा अधिकारी मोहन घोडके, धनाजीराव पवार, अमोल तरंगे, रमेश आवताडे, गणेश शितोळे, ऊस उत्पादक शेतकरी भगवान सुळ, रामचंद्र मगर, नितीन जाधव आदी उपस्थित होते.