ओम्रीकॉन संकट : गुजरातमध्ये ८ शहरांत ३१ डिसेंबरपर्यंत नाईट कर्फ्यूत वाढ

42

देशात कोरोनाच्या नव्या ओम्रीकॉन व्हेरियंटने गती घेतली आहे. भारतात या व्हेरियंटचे १७० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओम्रीकॉनने आतापर्यंत १२ राज्यांमध्ये हातपाय पसरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विविध राज्य सरकारेही सतर्क झाली आहेत. यामुळेच गुजरात राज्य सरकारने मोठ्या आठ शहरांतील नाईट कर्फ्यू ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. गुजरातमधील मोठ्या

शहरांमध्ये मध्यरात्री १ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू कायम राहील. यामध्ये अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागढ यांचा समावेश आहे.

याबाबत उपलब्ध अहवालानुसार, गुजरातमध्ये ओम्रीकॉनचे संशयित ११ रुग्ण आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी संसदेत सांगितले की, देशात ओम्रीकॉनचे १६१ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. हे रुग्ण राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, चंदीगड अशा वेगवेगळ्या राज्यांत दिसून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here